सलग समतल चर
उद्दिष्ट्ये
1) तिथल्या तिथे पाणी मुरविणे व मृदसंधारण करणे.
2) गायरानांची अथवा कुरणांची निर्मिती करणे.
संरचना
ही पद्धत सलग समतल बांधासारखी आहे. पण जेथे जमीन 25 सें. मी. पेक्षा जास्त खोल व उतार 20 टक्क्यापेक्षा कमी असतो अशा जमिनीवर या प्रकारचे चर खोदावे. या पद्धतीत कमी खोदकामात अथवा मातीकामात व जास्त पाणी साठवण्याची क्षमता आहे. परंतु ही पद्धत वर सांगितल्या प्रमाणे खोल जमिनीतच वापरली जाते.
चारा उत्पादनाकरिता जमीन वापरायची असल्यास या पद्धतीला अग्रक्रम द्यावा. दोन चरांमधील अंतर जमिनीच्या उतारानुसार ठरवावे. उतार कमी असल्यास पाणी मुरविण्यासाठी जास्त वेळ मिळतो. चर सामान्यत: 0.75 मी. x 0.75 मी. आकाराचे खोदावे. पाऊस पडण्यापूर्वी जमीन एक वेळा वखरावी. त्यामुळे जमिनीची पाणी मुरविण्याची क्षमता तर वाढतेच त्याचबरोबर गवताचे बी वाहून जाण्याचा व चरात जमा होण्याचा धोका टळतो.
चर खोदून काढलेली माती उताराकडील बाजूस बांधाच्या स्वरुपात टाकावी व या बांधावर रोपे लावावीत. दोन चरांमधील जमीन 15 सें. मी. पर्यंत खोल नांगरावी. त्यामुळे जमिनीची पाणी जिरविण्याची क्षमता वाढते व गवताचे बी वाहून न जाता जागेवरच रुजते. चरांमुळे पाणी धरून ठेवले जाते व ते मूळ क्षेत्रात झिरपते. जमिनीची खोली चांगली असल्यास बहुउद्देशीय झाडे लावावीत. चार्याच्या गवतासोबतच वार्षिक तसेच बहुवार्षिक कडधान्याची लागवड करावी. यामुळे जमिनीचा कस व उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.