गवतांची लागवड
जल - मृद्संधारणासाठी पुढील गवतांची लागवड करावी.
दर्भ गवत
हे गवत एक मीटरपर्यंत वाढते. हे बहुवार्षिक असल्याने खोड ताठ आणि दांडगे असते. भुईसरपट आडवे जाणारे, अनेक खोडे या प्रजातीस असतात. त्यापासून अनेक शाखा येतात व आजूबाजूला नवांकुर येऊन नवीन झाडे मुख्य झाडाभोवती तयार होतात. कमी पाण्यावर येणारे हे गवत खोडाच्या किंवा मुळांच्या छाटाने लागवड करतात.
मुंज
हे गवत पाच मीटरपर्यंत वाढते. खोड ताठ, जोरदार कांडे असणारे असते. या बहुवर्षायू गवताची लागवड बिया किंवा खोडाच्या छाटापासून केली जाते.
मारवेल
या गवताची उंची १५ ते ९० सें.मी. पर्यंत वाढते. लागवड बियांपासून केली जाते.
वाळा (खस)
या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्संधारणासाठी अतिशय चांगले मानले जाते. लागवड स्लिप्स’पासून केली जाते.
कुंदा
हे गवत तीन फुटांपर्यंत वाढते. बहुवर्षायू या गवताला आडवे खोड असते. त्यापासून धुमारे निघतात आणि बियांपासून याची लागवड होऊ शकते.
पवना
सुमारे तीन फुटांपर्यंत वाढणारे या बहुवर्षायू गवताचे खोड मुळाजवळ जाड, भक्कम व गुळगुळीत असते. लागवड बियांपासून होते.
शेंडा
हे बहुवर्षायू गवत दोन फुटांपर्यंत वाढते. पवना गवतासारखे दिसणारे, मात्र खोड थोडे लवचिक असते. लागवड बियांपासून होते.
मोशी
डोंगर-उतारावर १५ ते ५० सें.मी.पर्यंत वाढते. हे बहुवर्षायू गवत आहे. पारंपरिक गवताबरोबरच गिन्नी, रोड्स, सिटारिया, पॅराग्रास इ. गवताची लागवड मृद्संधारणाबरोबरच गुरांना चारा म्हणून केली जाते. नद्या, नाले, ओहोळ, रस्ते खचणे, ढासळणे यावर उपाय म्हणून बांबू लागवड करावी. कळक, मानवेल, चिवारी, मेस, कोंड्यामेस, मेसकाठी, पिवळाबांबू आणि बुद्धा बांबू इ.ची लागवड आपण नवीन येणारी फुटवे (कंद), बिया, खोडाचे छाट इ.पासून करू शकतो. गवताच्या बरोबरीने झुडपांची लागवड मृद् आणि जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते. यासाठी करवंद, घायपात, निर्गुडी, अडुळसा, मेंदी, कडू मेंदी, चित्रक इ.ची लागवड करावी.