शेततळे
शेतजमीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेततळे फायदेशीर ठरते. शेतात तळे करून भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठविणे व त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनास करणे हा होय.
या तळ्यात पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशावेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता आल्यास हमखास पीक येते.
शेततळ्याचे प्रकार
१) नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून,
२) सपाट जमिनीवर शेततळे.
शेततळ्यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते, आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते, पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो.
जागेची निवड ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी काळी जमीन ज्यात चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे अशी जमीन शेततळ्यास उपयुक्त आहे.
जमिनीच्या उताराच्या भागात शेततळे घ्यावेत. मुरमाड वालुकामय सच्छिद्र खडक किंवा खारवट जमीन शेततळ्यास निवडू नये. शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. अस्तरा साठी वेन्टोनाईट, माती सिमेंट मिश्रण, दगड, विटा, सिमेंट मिश्रण, चिकण माती किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर, प्लॅस्टिक फिल्म वापरताना त्याची जाडी ३०० ते ५०० जीएसएम असावी.