कंटूर बांध
पाणलोट क्षेत्रात मधल्या भागात डोंगराच्या पायथ्याजवळ समपातळी बांध तयार केले जातात. जमिनीवरील माती उकरून माती आणि मुरूम यांचा भराव करून हे बांध तयार केले जातात. बर्याच वेळा हे बांध भुसभुशीत राहतात. जनावरे या भागात परत आल्यास त्यांच्या पायाने हे बांध मोडले जाऊ शकतात व पावसाचे पाणी या बांधामधून वाहून छोट्या घळी निर्माण होतात. परिणामी हे दुर्लक्षित राहिल्यास याचा उपयोग न होता, जमिनीची धूप होते.
प्रत्येक पावसाळ्यापूर्वी या समपातळी बांध्याची पाहणी करून तुटलेल्या ठिकाणी दुरुस्त केले तर त्याचा उपयोग दीर्घकाळ होईल. समपातळी बांध बांधल्यानंतर तीन ते चार वर्षे ही क्रिया केल्यास या काळात हे बांध मजबूत होऊन स्थिर होतील.