• प्रस्तावना
  • कृषिविषयक पद्धती
    • समपातळी मशागत
    • आंतरपीक पद्धती
    • सरी पद्धती
    • आच्छादनाचा वापर
    • चिबड जमिन
  • भौतिक पद्धती
    • समपातळी चर
    • सपाट ओटे
    • जैविक बांध
    • घळ नियंत्रक बांध
    • समपातळी बांध
    • ढाळीचे बांध
    • दगडी बांध
    • अनघड दगडी बांध
    • ओहोळ बांध
    • कंटूर बांध
    • विखुरलेले चर
    • सलग दगडी समतल बांध
    • सलग समतल चर
    • पाणी व गाळरोधक बंधारे
    • गवतांची लागवड
    • वनशेती
    • वनीकरण
  • जलसंधारण
    • गॅबियन बंधारा
    • वनराई बंधारा
    • कोकण विजय बंधारा
    • घडीचा बंधारा
    • रस्त्याच्या मोर्‍या बंद करणे
    • अस्तरीत वनराई बंधारा
    • वळण बंधारा
    • मातीनाला बांध
    • सिमेंट नाला बांध
    • कोल्हापूर पद्धतीचा बांध
    • भूमिगत बंधारा
    • खोदतळे
    • शेततळे
    • सामुहिक तलाव
    • विहीर पुनर्भरण
    • कोकण जलकुंड
  • Contact us
Contact No.020-24467215
Picture
Picture

गॅबियन बंधारा

जाळीच्या सांगाड्यात दगडांचा जो बांध घातला जातो, त्यास गॅबियन बंधारा असे म्हणतात. ज्या ठिकाणी पर्जन्यमान जास्त असेल आणि नाल्याच्या तळाचा उतार जास्त असेल, अशा ठिकाणी प्रवाहामुळे दगडी बांध टिकू शकत नाही. अशा ठिकाणी गॅबियन बंधारा उपयुक्त आहे.

गॅबियन बंधारा बांधावयाच्या नाल्याची रुंदी दहा मी.पेक्षा अधिक असू नये. नाल्याच्या वळणावर हा बंधारा बांधू नये. गॅबियन बंधार्‍याची उंची एक मी.पेक्षा जास्त नसावी. ज्या ठिकाणी खडक, मुरूम आहे अशा ठिकाणी हा बंधारा बांधू नये. ज्या ठिकाणी बंधारा बांधावयाचा आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूंकडील काठ खोदून घ्यावेत. नंतर बंधार्‍याच्या आकारमानानुसार लोखंडी जाळी अंथरावी. नंतर त्यात दगड रचून घ्यावेत. मोठ्या दगडांमधील पोकळ्या लहान दगडांनी भरून घ्याव्यात. दगड रचून झाल्यानंतर जाळी तारेने बांधून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत पुरामुळे बांध वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. बांधाची माथा रुंदी ०.४५ मी. ठेवावी. बांधाच्या बाजूला उतार हा १:१ असा ठेवावा. ज्या ठिकाणी दगड उपलब्ध आहेत तेथे बंधारा बांधावा.गॅबियन बंधार्‍यामुळे पाण्यासोबत वाहून येणारी माती बंधार्‍याच्या वरच्या बाजूला अडविली जाते.
गॅबियन बंधाराची जागा निवडताना काठाची माती खरडून जाणार नाही अशी जागा निवडावी. नाल्याची रुंदी दहा मीटरपेक्षा जास्त असू नये. नाल्याच्या वळणावर बांधाची जागा निवडू नये. गॅबियन स्ट्रक्चर मूलतः मृद्संधारणासाठी असल्याने त्याची उंची सहसा एक मीटरपेक्षा जास्त किंवा नाल्याच्या खोलीच्या १/३ उंचीपेक्षा जास्त असू नये. तसेच सिमेंट बांध/ नाला बांध खोदतळेच्या वरील बाजूस या कामाचे नियोजन करावे.

Powered by Create your own unique website with customizable templates.