भूमिगत बंधारा
ज्याप्रमाणे भूपृष्ठावरील पाणलोट अडवून त्याची साठवण करण्यासाठी नालाबांध घातले जातात, त्याचप्रमाणे भूजलाचे प्रवाह अडवून त्याची जलथरात साठवण केळी जाते त्यास भूमिगत बंधारा असे म्हटले जाते किंवा यास मातीचा उलटा बांध असेही म्हटले जाते.
उद्दिष्ट्ये
१) भूमिजल पाणलोटास अटकाव करून भूजल पातळीत वाढ करणे.
२) बाष्पीभवनामुळे होणार्या पाण्याचा अपव्यय टाळणे.
३) विहिरी / कुपनलिका पुंर्भार्नास मदत करणे.
जागा निवड
१) नालापात्रची रुंदी १० ते ३० मी. पर्यंत असावी.
२) नालातळाचा उतार १ ते २ टक्के पर्यंत असावा.
३) नालापत्रात किमान १ मी. पेक्षा जस्त खोलीची व २०० ते २५० मी. लांबपर्यंत वाळू असावी.
४) बंधार्याच्या आसपास विहिरीवर आधारित सिंचन क्षेत्र जस्त असावे.
संरचना
नालापात्रात नालारुंदी एवढे आणि बंधार्याच्या अपेक्षित रुंदीएवढे खोदकाम कठीण स्तरापर्यंत करावे. खोदकाम करताना चरास १:२ या प्रमाणात बाजू उतार द्यावा. गाभा भिंत काळ्या मातीने थराथराणे पाणी मारून दबाई करून घ्यावी व चराच्या रिकामी जागा, चारातून निघालेल्या माती / वाळूने दबाई करून भरून घ्यावी. नाल्याच्या दोन्ही काठामध्ये चिकणमाती बंधार्याचा गुतावा असावा. गाभा भिंतीसाठी उपलब्ध नसल्यास सिमेंट व विटेचे बांधकाम अथवा सिलपोलिन पेपरचा वापर करता येतो.