घडीचा बंधारा
कोकणातील नाले पावसाळ्यात भरून वाहतात. तसेच पाण्याचा वेगसुद्धा खूप असतो. त्यामुळे वनराई किंवा दगडी बंधारे पाण्याबरोबर वाहून जातात. तेव्हा घडीचा बंधारा सुयोग्य जागा निवडून बांधल्यास वनराई किंवा दगडी बंधार्यावर पर्याय म्हणून वापरता येईल. या बंधार्यासाठी गावातच उपलब्ध असलेले साहित्य योग्य पद्धतीने आखणी करून वापरता येते.
फायदे
1. मृद व जल संधारण होते व पुनर्भरणास मदत होते.
2. कमी खर्चात जास्त काळ टिकते. पुन: पुन्हा वापरात येत असल्यामुळे दरवर्षी खर्च करावा लागत नाही.
3. मजूर कमी लागतात. लावण्याची पद्धत तसेच घडी करून ठेवण्याची पद्धत सहज आणि सोपी असल्याने लोक सहभागातून बंधारा उभा करणे व काढणे सहज शक्य आहे.
जागेची निवड
1. जेथे नाल्याची खोली 2 मीटरपेक्षा कमी व कमीत कमी रुंद असेल.
2. कमी उंचीच्या बंधार्यामध्ये जास्त पाणी साठविता येईल.
3. नाल्याच्या तळ्याचा उतार 3 टक्क्यापेक्षा कमी असावा.
लागणारे साहित्य
1. पन्हाळी पत्रा.
2. नट बोल्ट
3. लोखंडी फ्रेम
4. वेल्डींग
घडीच्या बंधार्याच्या कामाची पद्धत
1. नाल्यातील जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे 0.30 ते 0.50 मी. खोल व 0.30 मी. रुंदीचा पाया असे खोदकाम करावे.
2. नाल्याच्या नियोजित जागेची निवड केल्याप्रमाणे तयार केलेला घडीचा बंधारा पाण्यामध्ये व्यवस्थित बसवावा.
3. पाण्यातून काढलेली माती पुन्हा भरण करून व्यवस्थित दाबून घ्यावे.
4. बंधार्याची रुंदी निश्चित करताना बंधारा दोन्ही बाजूस अंदाजे 30 सें. मी. आत जाईल याची काळजी घ्यावी.
5. घडीचा बंधारा नीट बसवून झाल्यावर घडी बंद करावी व बंधार्याच्या वरच्या बाजूस पाणी जमा होताना दिसेल.
अशा प्रकारचे एका खाली एक घडीचे बंधारे साखळी पद्धतीने नाल्यामध्ये बांधून पाणी अडविता येते व साठविलेले पाणी रबी हंगामातील विकास व जल पुनर्भरणास सहाय्यक ठरते.