ढाळीचे बांध
हलक्या व मध्यम खोल जमिनीत म्हणजे ५० ते ६० सें.मी. खोलीच्या जमिनीत उतारास आडव्या ठराविक अंतरावर समपातळीतील बांध टाकावेत. या बांधामुळे पाणी अडविले जाते आणि जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होते, तर ढाळीचे बांध भारी खोल जमिनीत घालावेत.
ढाळीचे बांध समपातळीतील बांधाप्रमाणेच असून, त्यास ०.२ ते ०.४ टक्का उतार ठेवून पाण्याचा निचरा करण्यासाठी चारीची व्यवस्था करावी. बांधामुळे उताराची लांबी कमी होऊन जमिनीवरून वाहून जाणारे पाणी शेतात ठिकठिकाणी थांबवले जाते.
हा उपचार जास्त पावसाच्या प्रदेशात उपयुक्त आहे. या बांधामुळे पाण्यासोबत वाहून आलेली माती ही शेतबांधाच्या वरच्या बाजूस जमा होते. हा प्रकार उतार सात टक्क्यांपर्यंत असलेल्या व मध्यम निचर्याच्या जमिनीत घेणे फायदेशीर ठरते.