• प्रस्तावना
  • कृषिविषयक पद्धती
    • समपातळी मशागत
    • आंतरपीक पद्धती
    • सरी पद्धती
    • आच्छादनाचा वापर
    • चिबड जमिन
  • भौतिक पद्धती
    • समपातळी चर
    • सपाट ओटे
    • जैविक बांध
    • घळ नियंत्रक बांध
    • समपातळी बांध
    • ढाळीचे बांध
    • दगडी बांध
    • अनघड दगडी बांध
    • ओहोळ बांध
    • कंटूर बांध
    • विखुरलेले चर
    • सलग दगडी समतल बांध
    • सलग समतल चर
    • पाणी व गाळरोधक बंधारे
    • गवतांची लागवड
    • वनशेती
    • वनीकरण
  • जलसंधारण
    • गॅबियन बंधारा
    • वनराई बंधारा
    • कोकण विजय बंधारा
    • घडीचा बंधारा
    • रस्त्याच्या मोर्‍या बंद करणे
    • अस्तरीत वनराई बंधारा
    • वळण बंधारा
    • मातीनाला बांध
    • सिमेंट नाला बांध
    • कोल्हापूर पद्धतीचा बांध
    • भूमिगत बंधारा
    • खोदतळे
    • शेततळे
    • सामुहिक तलाव
    • विहीर पुनर्भरण
    • कोकण जलकुंड
  • Contact us
Contact No.020-24467215
Picture
Picture
     घळ प्रतिबंधक आणि नियंत्रक बांध

उद्दिष्ट्ये
1) पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह रोखून धरणे.
2) अतिवृष्टीचे पाणी रोखणे व जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे.
3) चांगल्या जमिनीत घळ वाढीस प्रतिबंध करणे.

​संरचना
जमिनीचा उतार, खोली, दगडांची उपलब्धता व गुणधर्म तसेच पावसाचे प्रमाण यावर अशा प्रकारच्या बांधाची निर्मिती अवलंबून असते.
बंधार्‍याची उंची व लांबी घळीच्या खोली व रुंदीवर अवलंबून असते. या प्रकारचे बंधारे घळीच्या संपूर्ण लांबीवर पायर्‍यांच्या स्वरुपात बांधले जातात. घळीवरील पहिला बंधारा मजबूत असावा. जेणेकरून माती कोरल्यामुळे या घळीचा विस्तार होऊ नये. पूर्ण घळीच्या काठावर तसेच बंधार्‍याच्या वरील व खालील बाजूस बांबूसारखी रोपे लावावीत.
बंधार्‍यावर तसेच घळीच्या जमिनीवर निरगुडी, बोरू, खस सारख्या खोल मूळांच्या रोपांची लागवड करावी. त्यामुळे जमीन धरून ठेवली जाते व जमिनीची धूप थांबवण्यात मदत होते. या बांधावरून पाणी वाहून जाऊ नये म्हणून जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी विमोचकाची व्यवस्था असावी. साठवलेल्या पाण्याच्या दाबाचा बांधावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून बांधाची दोन्ही टोके घळीच्या काठात आत खोलपर्यंत बांधावी.

Powered by
✕