पाणी व गाळरोधक बंधारे
उद्दिष्ट्ये
1) पात्रात पाणी जमा करणे.
2) सभोवतालच्या जमिनीवर जीवसृष्टीचा विकास करणे.
3) मृदसंधारण करणे.
संरचना व कार्यपद्धतीचे विवरण
हा बंधारा घळीवर बांधण्यात येणार्या बंधार्यासारखाच असतो. परंतु पूर्णत: मातीने बांधण्यात येत असून जोडीला त्यावर निरगुडी सारखी खोल मूळे असलेली झुडुपे, बोरू, रानमूग, अंजन आणि श्रवणघास सारखे चार्याचे गवत तथा खस गवत पेरले जाते. त्यामुळे या बंधार्यास मजबुती प्राप्त होते.
नाल्याच्या किंवा घळीच्या पात्रात सुद्धा बहुउद्देशीय झाडे वैरणीसोबत लावली जातात. या प्रकारच्या बंधार्याची उंची त्या पात्राच्या पाणलोट क्षेत्रावर अवलंबून असते. अशा बंधार्याची निर्मिती होणे महत्वाचे आहे.