वनीकरण
डोंगर-उताराच्या जमिनीवर मातीची धूप रोखण्यासाठी, वनीकरण, तसेच कुरण विकासाची कामे घेण्यात येतात. अशा जमिनीवर मातीची धूप झाल्याने या ठिकाणी पिकांऐवजी चारापिके आणि झुडपांची लागवड करावी. अशा जमिनीवर धूप थांबविण्यासाठी गवताची लागवड करावी, यामुळे पावसाच्या पाण्याचा वाहण्याचा वेग कमी होतो आणि पाणी जमिनीत जास्त मुरते. दगडी छोट्या बंधार्याने घळी निर्माण होतात. या घळीचा आकार वाढण्यापूर्वी छोट्या-छोट्या दगडी बंधार्यांनी यावर अडथळा निर्माण करावा. जेणेकरून घळीची रुंदी व खोली वाढणार नाही. जमिनीची धूप कमी प्रमाणात होईल आणि माती वरच्या भागालाच थांबेल.
पाणलोट क्षेत्रातील जमिनीचा प्रकार, पीकपद्धती व योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी वनशेतीच्या विविध पद्धतींद्वारे जमिनीचे व पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य आहे. पाणलोट क्षेत्राचे सर्वेक्षण करून त्याचा उंच - सखल भाग, उतार आणि जमिनीचा प्रकार दर्शविणारा नकाशा बनवावा. म्हणजे तेथील सर्व जमिनीचे जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पीक / झाडे वनशेती पद्धती व योग्य तंत्रज्ञानाचा वापर याचे नियोजन करून पर्यावरण संतुलनाबरोबरच शेती शास्त्राचे आर्थिक संतुलन साधता येते.