रस्त्याच्या मोर्या बंद करणे
रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी रस्त्याच्या वर मोर्या बांधलेल्या असतात आणि त्यातून पावसाचे पाणी थेट नाल्यांना जाऊन मिळते व सोबत मातीसुद्धा वाहून नेली जाते. मोर्यामधून वाहून जाणारे पाणी त्यांची तोंडे बंद करून अडविल्यास जल पुनर्भरणास मदत होईलच. सोबत मोर्या व रस्त्याची होणारी धूपसुद्धा थांबविता येईल.
या प्रकारची कामे लोकसहभागातून घेतल्यास जलसंधारणा-मध्ये क्रांती केल्यासारखेच होईल.
फायदे
1. मृद व जल संधारण होते.
2. जलपुनर्भरण, तात्पुरती साठवण आणि काठ मजबूतीकरण.
जागेची निवड
1. मोर्यांचा उतार 5 टक्क्यापेक्षा कमी असावा.
2. मोर्यांच्या लगत वळण नसावे.
बांधकामासाठी लागणारे साहित्य
1. जी. आय पत्रा
2. रबर
3. लोखंडी फ्रेम
4. सिमेंट, खडी, वाळू इ.
मोर्या बंद करण्याच्या कामाच्या पद्धती
1. मोर्यांच्या उतारानुसार व खोलीनुसार अडवणूक बंधार्याची उंची व रुंदी ठरवावी.
2. मोरीच्या कडेने लोखंडी फ्रेम बनवून घ्यावी की जेणेकरून त्यामध्ये लोखंडी जाड पत्रा टाकून ते घट्ट बसवता येईल.
3. लोखंडी पत्रा घट्ट बसविण्यासाठी लोखंडी फ्रेमला रबर सोलींग बसवावे.
4. ही लोखंडी फ्रेम मोरीच्या वरच्या तोंडावर सिमेंट कॉंक्रीटमध्ये घट्ट बसवून घ्यावी.
5. लोखंडी पत्रा या फ्रेममध्ये पावसाळा संपताना सप्टेंबर महिन्यात बसवावा व तो रबर सिलींगमध्ये पाणी कडेने जाणार नाही अशा पद्धतीने घट्ट करावा.
6. लोखंडी पत्र्याने मोरीचे तोंड पूर्णपणे बंद करू नये. साधारणत: 3 / 4 तोंड बंद करून मोरीच्या वरील बाजूने अतिरिक्त पाणी जाण्यासाठी जागा ठेवावी.
7. अडलेले पाणी आटले की लोखंडी पत्रा काढून ठेवावा आणि पुढील वर्षी पुन्हा पावसाळा संपताना बसवावा की जेणेकरून तो न गंजता जास्त दिवस टिकेल.
8. या पद्धतीने अडविलेल्या पाण्याचा वापर पुनर्भरणासाठी, जनावरांसाठी आणि दुबार पिकासाठी होऊ शकतो.